Devendra Fadnavis:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राने देशातील 52.46% परकीय गुंतवणूक आकर्षित केली

Devendra Fadnavis: गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis Maharashtra attracted 52.46% foreign investment in the country

News Continuous Bureau | Mumbai

Devendra Fadnavis: गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

Join Our WhatsApp Community
Deputy Chief Minister Devendra Fadnavis Maharashtra attracted 52.46% foreign investment in the country

Deputy Chief Minister Devendra Fadnavis Maharashtra attracted 52.46% foreign investment in the country

दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी),
तिसर्‍या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी),
चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी),
पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी),
सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी),
सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी),
आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी),
नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी)

या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

यापूर्वी
2022-23 : 1,18,422 कोटी
(कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक)

2023-24 : 1,25,101 कोटी
(गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक)

राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली.
दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे…

Disclaimer : Except for the headline, this story has not been edited by News Continuous staff and is published from a syndicated feed.

Borivali: बोरीवलीत भाजपमध्ये सुटत नाही तिढा उमेदवारीचा; जनतेची मागणी – हिच वेळ, करा विचार स्थानिक प्रामाणिक उमेदवाराचा!
Somnath demolition: સોમનાથ મંદિર પાસે બુલડોઝર એકશન પર સુપ્રીમ કોર્ટ કડક, સરકાર પાસે માંગ્યો જવાબ, જો દોષિત જણાશે તો કરશે આ કાર્યવાહી…
Renew Energy:रिन्यू एनर्जीने सोलर प्रोजेक्ट गुजरातला हलवण्याच्या योजना नाकारल्या
Devendra Fadnavis:कांदा, सोयाबीन आणि धान उत्पादकांसाठी केंद्राचा दिलासा; देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांचे मानले आभार
Exit mobile version